मराठा कुणबी वेबसाईट का चालू केली ?

नमस्कार मित्रांनो,

आज मी एक नवीन वेबसाईट चालू करत आहे. टायटल वाचून अंदाज आलाच असेल कि, या मध्ये नेमके काय असणार आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा मागील कित्येक दिवसांच्या लढ्याच्या यशाचा एकत्रित आढावा घेण्याचा यात प्रयत्न असणार आहे.

विशेषतः मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आंदोलनाचा यातून आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. मनोज दादांनी सुरुवातीपासून मराठ्यांना ओ.बी.सी. तून आरक्षण देण्याच्या केलेल्या मागणी मुळेच आज हजारो मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. समस्त मराठा समाज त्यांचे सदैव ऋणी राहील. प्रस्तुत वेबसाईट च्या माध्यमातून आंदोलनाची विस्तृत माहिती करण्याचा उद्देश नसून, केवळ दादांच्या प्रयत्न मुळे महाराष्ट्राच्या सर्व विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये , गावामध्ये कुणा कुणाला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ झाला. हे सर्वाना माहिती व्हावे हा उद्देश ठेऊन हि वेबसाईट काम करेल. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्राला एका क्लिक वरती महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील माहिती सहज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यामध्ये यश यावे. एवढीच अपेक्षा.

Leave a comment